चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना १२.५० कोटींचे अनुदान मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:27 AM2021-05-06T04:27:33+5:302021-05-06T04:27:33+5:30
इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अथक प्रयत्नातून चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना घर अनुदान, शौचालय अनुदान व निर्वाह भत्ता देण्यासाठी ...
इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अथक प्रयत्नातून चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना घर अनुदान, शौचालय अनुदान व निर्वाह भत्ता देण्यासाठी १२ कोटी ५० लाख मंजूर झाले आहेत. लवकरच जयंत पाटील यांच्या हस्ते या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. ही माहिती प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते किसन मलप (बागणी), धावजी अनुसे (नेर्ले) यांनी दिली.
जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते किसन मलप, धावजी अनुसे, शंकर सावंत यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी तसेच वन व पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हा निधी मिळत असल्याने प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.