जिल्ह्यात १२८१ नवे कोरोनाबाधित; १२६९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:39+5:302021-05-26T04:28:39+5:30
जिल्ह्यातील ३३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ३, मिरज ५, शिराळा तालुक्यातील ५, खानापूर, मिरज तालुक्यांतील प्रत्येकी ४, ...
जिल्ह्यातील ३३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ३, मिरज ५, शिराळा तालुक्यातील ५, खानापूर, मिरज तालुक्यांतील प्रत्येकी ४, वाळवा, पलूस तालुक्यांतील प्रत्येकी ३, जत, कडेगाव, तासगाव तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या १३ हजार २४९ रुग्णांपैकी २०९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १८१३ जण ऑक्सिजनवर, तर २८२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी आरटीपीसीआर अंतर्गत १९१८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५२२ जण बाधित आढळले आहेत, तर रॅपिड अँटिजनच्या ४१७४ जणांच्या नमुने तपासणीतून ८२८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला असून, नवीन ६९ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १११९३४
उपचार घेत असलेले १३२४९
कोरोनामुक्त झालेले ९५४५४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३२३१
मंगळवारी दिवसभरात
सांगली १२९
मिरज ५५
वाळवा २५२
जत १३५
मिरज तालुका १२८
शिराळा ११५
तासगाव १०१
पलूस ८४
कडेगाव ८३
खानापूर ७४
कवठेमहांकाळ ७३
आटपाडी ५२
चौकट
म्युकरमायकोसिसचे १०८ रुग्ण
जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येतही वाढ हाेत आहे. आतापर्यंत १०८ जणांना बाधा, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात सोमवारी एकाचा मृत्यू झाला.