सांगलीत फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने वृद्धास १४ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:29 AM2021-09-23T04:29:19+5:302021-09-23T04:29:19+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित ताशिलदार यांची आस्था कन्स्ट्रक्शन नावाची फर्म असून, त्यांनी सह्याद्रीनगर ख्वॉजा कॉलनी येथे सुमंगल ...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित ताशिलदार यांची आस्था कन्स्ट्रक्शन नावाची फर्म असून, त्यांनी सह्याद्रीनगर ख्वॉजा कॉलनी येथे सुमंगल वास्तू नावाच्या अपार्टमेंटचे काम सुरू केले आहे. या अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०४ साठी फिर्यादी अनुगडे यांच्यासोबत खरेदीपत्र करून २६ लाख रुपये किंमत ठरली होती. यातील साडेआठ लाख रुपये रोख, तर विविध बँकाच्या धनादेशाद्वारे ३ लाख रुपये स्वीकारले आहेत. त्यानंतर पुन्हा दोन लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले असे एकूण १३ लाख ९९ हजार ९५० रुपये संशयितांनी अनुगडे यांच्याकडून घेतले होते. त्यानंतर फ्लॅट त्यांना न देता दुसऱ्याच व्यक्तीला खरेदी दिल्याचा प्रकार फिर्यादी अनुगडे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी संशयितांविरोधात संजयनगर पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.