वारणा धरणात १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 01:02 PM2020-07-04T13:02:17+5:302020-07-04T13:03:41+5:30

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

14.66 TMC in Warna Dam. For water | वारणा धरणात १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्दे वारणा धरणात १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठाकोयना धरणामध्ये ३२.०३ टी.एम.सी पाणीसाठा

सांगली -जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये ३२.०३ टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टी.एम.सी, धोम धरणात ५.६७ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता १३.५० टी.एम.सी, कन्हेर धरणात २.४४ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १०.१० टी.एम.सी., उरमोडी धरणात ५.२९ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ९.९७ टी.एम.सी, तारळी धरणात १.९८ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता ५.८५ टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात १०.५८ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता २५.४० व राधानगरी धरणात ३.०२ टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता ८.३६ टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात ७०.२७ टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता १२३ टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे.

कोयना २१११, वारणा ५६०, कण्हेर २४, राधानगरी ६००, तुळशी १००, उरमोडी १००, तारळी ३७०, अलमट्टी ११३०.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.

कृष्णा पूल कराड ५.७(४५), आयर्विन पूल सांगली ६.९ (४०) व अंकली पूल हरिपूर ५.११ (४५.११).

 

 

Web Title: 14.66 TMC in Warna Dam. For water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.