अंकलेश्वर सोसायटीतर्फे १५ टक्के लाभांश : राजेश चाैगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:21+5:302021-09-27T04:28:21+5:30
करोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. यावेळी ते बोलत होते. राजेश चौगुले म्हणाले की, ३१ ...
करोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राजेश चौगुले म्हणाले की, ३१ मार्चअखेर संस्थेचे वसूल भागभांडवल ५० लाख ८१ हजार, राखीव व इतर निधी १५ लाख ३२ हजार, ठेवी १० कोटी १३ लाख, गुंतवणूक एक कोटी ६६ लाख, कर्ज वाटप सात कोटी १५ लाख, निव्वळ नफा २२ लाख ७५ हजार, एन.पी.ए. शून्य टक्के तर ऑडिट वर्ग अ सतत राहिले आहे.
उपाध्यक्ष रघुनाथ गडदे यांनी अहवाल वाचन केले. रामगोंडा पाटील यांनी सचिव केले. आप्पासाहेब सकळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र कुंभार यांनी आभार मानले. यावेळी घनश्याम सूर्यवंशी, अजित शिरगावकर, जगन्नाथ मिरजकर, सतीश पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, भालचंद्र बिरनाळे, युवराज भागवत, अरुण पाटील, प्रमोद मिरजकर, मधुकर चौगुले, दुष्यंत मिरजकर, एस. के. चौगुले, रावसाहेब वाकळे, महादेव चौगुले, अशोक चौगुले, संदीप पाटील, बाजीराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
260921\1733-img-20210926-wa0068.jpg
photo