सांगलीत गतवर्षीच्या तुलनेत १५० टन कमी कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:41 PM2020-11-19T12:41:25+5:302020-11-19T12:43:41+5:30

Diwali, Garbage Disposal Issue, sanglinews दिवाळीच्या काळात बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी झालेली गर्दी, रस्त्यावर टाकलेली फुले, फटाक्यांच्या आतषबाजीने शहरात निर्माण होणारा शेकडो टन कचरा असे नेहमीचे चित्र यंदा मात्र पालटले होते. गतवर्षी महापालिकेने दिवाळीच्या काळात २०० टन कचरा उचलला होता. यंदा केवळ ५५ टन कचरा उचलल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियम पाळून दिवाळी साजरी केल्याचे यावरून दिसून येते.

150 tons less waste in Sangli than last year | सांगलीत गतवर्षीच्या तुलनेत १५० टन कमी कचरा

सांगलीत गतवर्षीच्या तुलनेत १५० टन कमी कचरा

Next
ठळक मुद्देदिवाळीत ५५ टन कचरा उचलला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून खबरदारी

सांगली : दिवाळीच्या काळात बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी झालेली गर्दी, रस्त्यावर टाकलेली फुले, फटाक्यांच्या आतषबाजीने शहरात निर्माण होणारा शेकडो टन कचरा असे नेहमीचे चित्र यंदा मात्र पालटले होते. गतवर्षी महापालिकेने दिवाळीच्या काळात २०० टन कचरा उचलला होता. यंदा केवळ ५५ टन कचरा उचलल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियम पाळून दिवाळी साजरी केल्याचे यावरून दिसून येते.

दिवाळी सणात शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. विशेषत: मुख्य बाजारपेठेत कचऱ्याचे प्रमाण अधिक असते. दररोज रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेतील रस्ते महापालिकेला स्वच्छ करावे लागतात. यंदाही महापालिकेने सणाच्या काळात शहर चकाचक राहील याची खबरदारी घेतली होती. गेल्या काही वर्षात दिवाळीत १५० ते २०० टन कचरा निर्माण होत होता. यंदा मात्र त्यात बरीच घट झाली आहे. दिवाळीच्या काळात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ५५ टन कचरा उचलला आहे. तब्बल ४५० कर्मचारी व १४ वाहने त्यासाठी कार्यरत होती.

दिवाळीच्या पूर्वसंध्येपासून ते पाडव्यापर्यंत रस्त्यावर पडणारा कचरा उचलण्यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी आरोग्य यंत्रणेला सज्ज ठेवले होते. या उत्सव काळात उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्या पथकाने चोख नियोजन केले होते.

Web Title: 150 tons less waste in Sangli than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.