सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:05 PM2022-12-01T14:05:42+5:302022-12-01T14:06:10+5:30
सरपंच आणि सदस्यत्वासाठी आत्तापर्यंत अडीच हजार अर्ज दाखल आहेत.
सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी तिसऱ्या दिवशी दहा तालुक्यांतून दीड हजार जणांनी अर्ज दाखल केले. सरपंचपदासाठी २२५, तर ग्रामपंचायत सदस्यासाठी एक हजार २२४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल आहेत. सरपंच आणि सदस्यत्वासाठी आत्तापर्यंत अडीच हजार अर्ज दाखल आहेत. उमेदवारी अर्जासाठी शुक्रवारी, दि. २ मुदत असून उर्वरित दोन दिवसांच्या कालावधीत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. ओबीसींना आरक्षण दिले गेले नसल्याच्या कारणातून पाच ग्रामपंचायतींना या निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात आले. आता उर्वरित ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी दहा तालुक्यांतून दीड हजार अर्ज दाखल झाले. सरपंच पदासाठी २२५, तर सदस्यासाठी एक हजार २२४ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार, दि. २ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अद्याप दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शेवटच्या दोन दिवसांत विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दि. ५ डिसेंबरला अर्जांची छाननी, तर ७ डिसेंबरला उमेदवारी माघारी घेण्याची मुदत आहे.
आतापर्यंत दाखल अर्ज
तालुका - ग्रामपंचायती - सरपंच - सदस्य
मिरज - ३६ - ३२ - २००
तासगाव - २६ - २२ - ८५
क. महांकाळ - २८ - १६ - ५६
जत - ८१ - ११० - ४०७
खानापूर - ४५ - ४३ - २०५
आटपाडी - २५ - २८ - ७४
पलूस - १५ - ०८ - ७१
कडेगाव - ४३ - ५० - १२०
वाळवा - ८८ - १२९ - ६६९
शिराळा - ६० - ५४ - १८८
एकूण - ४४७ - ४९२ - २०७५