गुरुवारी १५ हजार नागरिकांचे झाले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:20 AM2021-05-28T04:20:47+5:302021-05-28T04:20:47+5:30
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १५ हजार ६४९ लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण झाले. बुधवारी २२ हजार डोस मिळाल्याने जिल्हाभरात २५०हून ...
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १५ हजार ६४९ लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण झाले. बुधवारी २२ हजार डोस मिळाल्याने जिल्हाभरात २५०हून अधिक केंद्रांवर लस उपलब्ध झाली. महापालिकेला साडेतीन हजार डोस देण्यात आले होते. पुरेशी लस आल्याने सर्वच केंद्रांवर सकाळपासून गर्दी दिसून आली. महापालिकेने आरोग्यवर्धिनी केंद्रांना मोजक्याच लसींचा पुरवठा केला, त्यामुळे अनेकांना लस मिळाली नाही. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वच केंद्रांवर लस संपली होती.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांना चांगला पुरवठा झाला, त्यामुळे ११ हजार ४७७ जणांचे लसीकरण झाले. निमशहरी भागात १ हजार ६७७ तर महापालिका क्षेत्रात २ हजार ४९५ जणांचे लसीकरण झाले. ४५ वर्षांवरील नागरिकांना ८४ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे, त्यामुळे गुरुवारी दिवसभरात पहिला डोस देण्याचेच काम झाले. तब्बल १५ हजार २८१ जणांना तो मिळाला. आजवरचे लसीकरण ६ लाख ९० हजार ४१० इतके झाले आहे.
दरम्यान, शुक्रवारीही लसीकरण सुरुच राहणार आहे. आगाऊ नोंदणीनुसार सर्रास नागरिकांना पहिला डोस मिळेल.