जिल्ह्यात १५७७ कोरोनामुक्त, ४३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:26 AM2021-05-15T04:26:22+5:302021-05-15T04:26:22+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी पुन्हा एकदा घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. परजिल्ह्यातील १० जणांसह एकूण ५३ जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी जिल्ह्यातील ४३ जण मरण पावले. महापालिका क्षेत्रात १३, जत ३, वाळवा ३, खानापूर ८, मिरज ३, कडेगाव २, पलूस ५, तासगाव १, कवठेमहांकाळ १, आटपाडी २, तर शिराळा २ अशा रुग्णांचा समावेश आहे. नवे १२९२ रुग्ण सापडले.
उपचार घेत असलेल्या १७ हजार ६ रुग्णांपैकी २५०६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील २१८८ जण ऑक्सिजनवर, तर २७८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील १० जणांचा मृत्यू झाला असून, सोलापूर, सातारा व कोल्हापूरचे प्रत्येकी तिघे आहेत. एक जण कर्नाटकातील आहेत. नवे ८८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ९७,७०५
उपचार घेत असलेले १७,००६
कोरोनामुक्त झालेले ७७,८६९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २८३०
गुरुवारी दिवसभरात
सांगली ११२
मिरज ५७
जत २५७
मिरज तालुका १३३
वाळवा १०१
कडेगाव ७७
आटपाडी ८२
तासगाव १४०
खानापूर १५१
कवठेमहांकाळ ८९
पलूस ६५
शिराळा २८