जिल्ह्यात नवे १६ रुग्ण, ९ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:29 AM2021-02-24T04:29:36+5:302021-02-24T04:29:36+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ११७ ...
सांगली
: जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे १६ कोरोना रुग्ण आढळून आले, तर ९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ११७ रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील ३१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
महापालिका क्षेत्रात मंगळवारी सांगलीत १, तर मिरजेत ३ रुग्णांची नोंद झाली. आटपाडी, शिराळा व कडेगाव तालुक्यात प्रत्येकी एक, तर जत तालुक्यात ३ आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ६ रुग्ण आढळून आले. पलूस, तासगाव, मिरज, खानापूर वाळवा या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या ५४२ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १४७१ चाचण्यांत ६ रुग्ण सापडले. सध्या ३१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २१, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ४, तर नाॅन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ६ रुग्ण आहेत, तर परजिल्ह्यांतील ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.