सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

By अशोक डोंबाळे | Published: December 3, 2022 05:04 PM2022-12-03T17:04:06+5:302022-12-03T17:04:34+5:30

अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरपर्यंत मुदत. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार

16 thousand 951 applications filed for 447 gram panchayats in Sangli district, Record application in walva taluka | सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमधील १ हजार ५८८ प्रभागांतील सरपंचासह चार हजार ६५६ जागांसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी दोन हजार ४८२ तर सदस्यपदासाठी १६ हजार ९५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वाळवा तालुक्यातून सर्वाधिक सरपंचासह सदस्यपदासाठी तीन हजार ६७२ अर्ज दाखल झाले. या अर्जाची छाननी सोमवार, दि. ५ डिसेंबर रोजी असून, बुधवार, दि. ७ डिसेंबर अर्ज माघारीची मुदत आहे. यानंतरच निवडणुकीची खरी रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. सर्व्हर डाऊनची अडचण दूर करत ऑफलाइन अर्ज स्वीकारल्याने उमेदवारांची गैरसोय दूर झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केंद्रात प्रचंड गर्दी होती. वेळेपूर्वी आत आलेल्या सर्वांचे अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. त्यामुळे एकूण दाखल अर्जाची मोजणी करण्यात प्रशासनाला रात्री बारापर्यंत जागावे लागले. 

४४७ गावच्या सरपंचपदासाठी एकूण दोन ४८२ तर सदस्यपदासाठी १४ हजार ४६९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वाळवा तालुक्यातून सरपंचपदासह सदस्यासाठी सर्वाधिक तीन हजार ६२७ अर्ज आले आहेत. सोमवार, दि. ५ डिसेंबरला छाननी प्रक्रिया होणार असून, अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

रात्री उशिरापर्यंत प्रशासन जागे

अर्ज दाखल करण्यासाठी ऑफलाइन परवानगी दिल्यामुळे शेवटच्या दिवशी शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती. साडेपाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रात उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या अर्ज घेण्यात आले. गेल्या पाच दिवसांत आलेल्या एकूण अर्जाची नोंद करून एकत्रित माहिती करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत निवडणूक कामकाजासाठीचे कर्मचारी, अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण या स्वतः रात्री शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होत्या.

तालुकानिहाय अर्ज दाखल संख्या

तालुका सरपंच सदस्य
मिरज २१९ १५८६
तासगाव १५६ ८६०
क. महांकाळ १६७ १००४
जत  ४२८ २३४९
खानापूर १९९ ९७२
आटपाडी १४५ ८५१
पलूस १३४ ७७०
कडेगाव २६७  १३१४
वाळवा ४४५ ३१८२
शिराळा ३२२ १५८१
एकूण २४८२ १४४६९

 

Web Title: 16 thousand 951 applications filed for 447 gram panchayats in Sangli district, Record application in walva taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.