जिल्ह्यातील १६ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:55 PM2017-11-29T23:55:28+5:302017-11-29T23:56:52+5:30
सांगली : जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या १९ हजार ७७४ शेतकºयांपैकी १६ हजार ६०३ शेतकºयांच्या खात्यावर बुधवारअखेर ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग झाले. अंतिम टप्प्यात २ हजार ४६ शेतकरी तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरल्याने त्यांचे ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत जाणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या अन्य शेतकºयांचे पैसे दोन दिवसात वर्ग होण्याची चिन्हे आहेत.
कर्जमाफीच्या शेवटच्या टप्प्यातही काही त्रुटींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. त्यामुळेच बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. जिल्ह्यातील ४० हजार ८५९ शेतकºयांना एकूण १०८ कोटी ५८ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा व अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यासंदर्भातील ‘ग्रीन लिस्ट’ जाहीर झाली असून, प्रत्यक्ष खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसात ६५ कोटी ४६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. अजूनही तीन हजार १७१ शेतकरी त्रुटींअभावी कर्जमाफीच्या कक्षेपासून दूर आहेत. यातील २0४६ शेतकरी पूर्णत: अपात्र ठरल्याने त्यांची यादी व ६ कोटी ३४ लाख रुपये शासनाकडे परत पाठविण्यात येणार आहेत. किरकोळ त्रुटी असलेल्या काही शेतकºयांच्या रकमा दोन दिवसात वर्ग होण्याची शक्यता आहे. नियमित कर्ज भरणाºया जिल्ह्यातील २१ हजार ८५ शेतकºयांना ३६ लाख ३८ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान वर्ग होत आहे. प्रोत्साहन अनुदानाचे पैसे थेट शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही स्तरावर आता कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात आली आहे.
दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºया १९ हजार शेतकºयांचा सात-बारा कोरा होणार असून, त्यांना एकूण ७२ कोटी 0४ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दीड लाखांच्या आतील शेतकºयांची मंजूर झालेली रक्कम खात्यांवर वर्ग होत असून, सात-बारा कोरे होत आहेत.
आजपासून मोबाईलवर मेसेज
कर्जमुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर आता गुरुवारपासून पात्र प्रत्येक शेतकºयाच्या मोबाईलवर कर्जमुक्तीचे संदेश जाण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात ही प्रक्रिया संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे अपात्र यादीची फेरपडताळणी शासनाकडून होऊन परत येण्याचीही शक्यता आहे.
तालुकानिहाय कर्जमाफी (कोटीत)
तालुका शेतकरी कर्जमाफी
आटपाडी ७५६ ३,२५९५६८८
जत ४६६८ १९,८0,६४,२८४
क. महांकाळ २0१६ ५,११,८४,८८६
कडेगाव ६४२ २,५0,२८,0३२
खानापूर १0८१ ३,३६,८२१६८
मिरज २३७५ ८,९७,४७,१८३
पलूस १२२0 ४,३३,२६,४00
शिराळा ४६२ १,३८,२८,७४७
तासगाव ४८0३ १८,५६,२७,१७७
वाळवा १७५१ ४,७३,३५,९३३
एकूण १९७७४ ७२,0४,२0,५0२