दिवसभरात १६ हजार जणांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:32+5:302021-05-11T04:28:32+5:30
सांगली : कोरोना लस आल्याच्या पहिल्या दिवशी १६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. दरम्यान, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठीची लस संपली असून, ...
सांगली : कोरोना लस आल्याच्या पहिल्या दिवशी १६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. दरम्यान, ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठीची लस संपली असून, मंगळवारी फक्त १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण सुरू राहणार आहे.
४५ वर्षांवरील वयोगटासाठी रविवारी १४ हजार ४०० डोस आले होते. ते सर्व सोमवारी संपले. दुसऱ्या डोससाठी त्यांचा प्राधान्याने वापर झाला. १५६८ जणांना पहिला, तर ३४८३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. ६० वर्षांवरील ११२८ जणांना पहिला, तर ५८८९ जणांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात आला.
१८ ते ४४ वयोगटातील ३०७४ जणांना पहिला डोस मिळाला. मंगळवारी फक्त याच गटाचे लसीकरण सुरू राहील. पोर्टलवर नोंद केलेल्यांनाच लस मिळेल. आज दिवसभरात एकूण १५ हजार ८९० जणांचे लसीकरण झाले. आजवर ६ लाख १४ हजार ४६२ जणांना लस देण्यात आली आहे.