सांगली जिल्ह्यातून वर्षभरात 'इतक्या' मुली, महिला गायब; पोलिसांचा तपास सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 17:33 IST2023-01-23T17:28:59+5:302023-01-23T17:33:17+5:30
मोबाइल अथवा संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याआधारे पोलिसांकडून या मुलींचा शोध

सांगली जिल्ह्यातून वर्षभरात 'इतक्या' मुली, महिला गायब; पोलिसांचा तपास सुरुच
सांगली : लग्नाच्या आमिषाने अथवा अन्य कारणाने अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार होत आहेत. यात अनेकदा महिलांचेही अपहरण करण्यात येते. कौटुंबिक अडचणी, आमिष आणि क्षणिक मोहाला बळी पडून अनेक मुली घराबाहेर पडतात; पण पोलिसांकडूनही अशा मुलींचा प्राधान्याने तपास करून त्यांना पालकांच्या हवाली स्वाधीन केले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात मुली, महिलांच्या अपहरणाच्या १६१ घटना घडल्या आहेत. यातील १२९ जणींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे तर अन्य मुलींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मुलींचा मोबाइल अथवा संशयिताची माहिती मिळाल्यावर त्याआधारे पोलिसांकडून या मुलींचा शोध घेतला जात आहे. या घटनांबाबत चिंता व्यक्त होत आहे.
समुपदेशनानंतर मुली पालकांच्या ताब्यात
बहुतांशवेळा अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे अपहरण करण्यात येते. अशा मुलींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात येते. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. - सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक