Sangli: नोकरीच्या आमिषाने १८ लाखांना गंडा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 02:06 PM2024-09-06T14:06:45+5:302024-09-06T14:07:41+5:30
कवठेमहांकाळ : तलाठी पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तीन जणांना १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात दोघा जणांविरुद्ध ...
कवठेमहांकाळ : तलाठी पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तीन जणांना १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास बापू पाटील (रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) प्रवीण गुंडा होनराव, (रा महांकाली मंदिराजवळ कवठेमहांकाळ) असे गुन्हा दाखल केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी धनश्री मंगेश पाटील (वय २७, रा. दिघी, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
विकास पाटील यांनी महसूल खात्यातील तलाठी पदाची नोकरी लावतो. असे म्हणून धनश्री पाटील यांच्याकडून ९ लाख रुपये तर संजय यल्लाप्पा रायपुरे यांना त्यांच्या पत्नीस भरती करतो असे भासवून ५ लाख रुपये तर अन्य एका युवतीकडून ४ लाख रुपये घेतले आहेत. एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे भरले आहेत. परीक्षेच्या कालावधीनंतर या तिघांनी विकास पाटील व प्रवीण होनराव यांना नियुक्तीसंदर्भात वारंवार विचारणा केली असता त्यांनी निवड झाल्याबाबत शासनाची मोहर असलेली नियुक्तीपत्रे पाठवले.
मात्र, त्यानंतर बराच कालावधी गेल्यानंतर अजूनही नियुक्ती होत नाही हे दिसल्यावर या तिघांनी त्यांना नियुक्ती करून द्या, असा तगादा लावला. मात्र, त्यानंतरही त्यांनी नियुक्ती केली नसल्यामुळे दिलेले पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या तिघांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कवठेमहांकाळ पोलिसात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत धनश्री पाटील यांच्या फिर्यादीनुसार विकास पाटील व प्रवीण होणाराव यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.