जिल्ह्यात १८ कोरोनाचे नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:33+5:302021-01-16T04:31:33+5:30
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तेवढीच असली तरी शुक्रवारी एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांतील जादा मृत्यूची शुक्रवारी ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तेवढीच असली तरी शुक्रवारी एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांतील जादा मृत्यूची शुक्रवारी नोंद झाली. शुक्रवारी पलूस, शिराळा, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झाली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत २४५ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजनच्या ५६५ चाचण्यांमधून १२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जिल्ह्यातील सहा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २२७ रुग्णांपैकी ४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३७ जण ऑक्सिजनवर तर ८ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. चिंताजनक रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७८९७
उपचार घेत असलेले २२७
कोरोनामुक्त झालेले ४५९२८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४२
शुक्रवारी दिवसभरात
सांगली १
मिरज २
आटपाडी ३
जत ४
कडेगाव ४
कवठेमहांकाळ ०
खानापूर १
मिरज तालुका १
पलूस ०
शिराळा ०
तासगाव ०
वाळवा २