जिल्ह्यासाठी १८ हजार लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:08+5:302021-07-01T04:20:08+5:30

मागील तीन दिवसात जिल्ह्यासाठी पुरेशी लसच मिळाली नव्हती. केंद्रावर रांगा लावूनही लस मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. बुधवारी ...

18,000 vaccines available for the district | जिल्ह्यासाठी १८ हजार लस उपलब्ध

जिल्ह्यासाठी १८ हजार लस उपलब्ध

Next

मागील तीन दिवसात जिल्ह्यासाठी पुरेशी लसच मिळाली नव्हती. केंद्रावर रांगा लावूनही लस मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. बुधवारी रात्री उशिरा १८ हजार लस मिळाली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना वाटप होणार आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील लसीकरण केंद्रांना तीन हजार आणि उर्वरित जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना १५ हजार लस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.

दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रावर शिल्लक लसीतून पहिला डोस १२३० तर दुसरा डोस १६४ असे एकूण १३९४ नागरिकांना मिळाला आहे.

चौकट

आजपर्यंत झालेले लसीकरण

प्रकार प्रथम डोस द्वितीय डोस एकूण

-आरोग्य कर्मचारी २८२५० १६६१३ ४४८६३

-फ्रंटलाइन वर्कर ३३६८३ १२१२३ ४५८०६

-१८ ते ३० वयोगट १०४५४ २०१ १०६५५

-३० ते ४५ वयोगट २४४९३ १३८ २४६३१

-१८ ते ४५ १६५१५ ४९३४ २१५४९

-४५ ते ६० २८५०११ ३८१५९ ३२३१७०

-६० वर्षांवरील सर्व २६५४०९ ७१६०७ ३३७०१६

एकूण ६६३९१५ १४३७७५ ८०७६९०

Web Title: 18,000 vaccines available for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.