कर्जमाफी, सवलतीसाठी १.९0 लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:37 AM2017-09-05T00:37:14+5:302017-09-05T00:38:13+5:30
सांगली : कर्जमाफी, सवलतीसाठी ४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १ लाख ९0 हजार अर्जांची नोंदणी झाली असून, यापैकी १ लाख ७0 हजार अर्जांच्या संगणकीय नोंदीचे काम पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कर्जमाफी, सवलतीसाठी ४ सप्टेंबरअखेर जिल्ह्यातील १ लाख ९0 हजार अर्जांची नोंदणी झाली असून, यापैकी १ लाख ७0 हजार अर्जांच्या संगणकीय नोंदीचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदगतीने चालणाºया आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेने आता गती घेतली असून, दिवसभरात १२ हजारांवर अर्जांची नोंदणी होऊ लागली आहे.
थकबाकीदार शेतकºयांसाठी कर्जमाफी व नियमित कर्जदारांना अनुदान योजना जाहीर होऊन आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. राज्य शासनाच्या कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५७ हजार शेतकरी पात्र आहेत. कर्जमाफीचा अर्ज आॅनलाईन भरायचा आहे. त्यामुळे अर्ज भरण्याची सोय सेतू केंद्रात करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट सुविधेच्या अडचणी आहेत. पूर्ण क्षमतेने इंटरनेट कनेक्शन मिळत नसल्याने नोंदणी गतीने करणे अशक्य होत आहे. अनेक शेतकºयांचे आधार कार्ड जोडले जात नाही. या कारणांनी अर्ज नोंदणीस वेळ लागत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात ४ सप्टेंबरअखेर १ लाख ९० हजार शेतकºयांचे अर्ज दाखल झाले असून, यापैकी १ लाख ७० हजार अर्ज संगणकावर अपलोड झाले आहेत.
संगणकीय नोंदीची गती गेल्या चार दिवसांपासून वाढली असून दिवसभरात १२ हजारावर अर्जांची नोंदणी होत आहे. हीच गती राहिली, तर १५ सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के नोंदणी पूर्ण होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम गतीने होण्यासाठी जिल्हा बँकेच्या २१८ शाखांपैकी १०० शाखांत बायोमेट्रिक यंत्रे देण्यात आली आहेत. गरज पडल्यास आणखी यंत्रे मागविण्यात येतील. ज्या गावातील सोसायट्यांमध्ये संगणक, इंटरनेटबाबत अडचणी आहेत, त्यांनी जिल्हा बँकेच्या शाखेतील ही यंत्रणा वापरण्यास हरकत नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
अन्य शहरातूनही अर्ज
मुंबई, पुणे व अन्य शहरातूनही सांगली जिल्ह्यातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांनी अर्ज दाखल केल्याचे दिसत आहे. अशा अर्जांचीही गोळाबेरीच आता करावी लागणार आहे.