पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:03 AM2021-07-08T10:03:45+5:302021-07-08T10:04:09+5:30

कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

2 days treatment on a dead patient for money; Shocking type in Sangli | पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार

पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार

Next

मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ. वाठारकर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

डॉ. वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअर मध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले. रुग्ण सायरा यांचा नॉन कोविड उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले.

दोन दिवसांनी डॉ.वाठारकर याने नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना १० मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भा.दं.वि.कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 2 days treatment on a dead patient for money; Shocking type in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.