सांगलीतील व्यापाऱ्यांची २० लाखाची फसवणूक, चारजणांविरुद्ध फिर्याद : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:11 PM2018-01-04T15:11:58+5:302018-01-04T15:12:26+5:30
सांगली येथील हळद व्यापारी भरत शिरीष अटल (वय ३०, रा. मीरा हौसिंग सोसायटी) यांना कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील एका फर्मने २० लाख १४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अटल यांनी उदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सांगली : येथील हळद व्यापारी भरत शिरीष अटल (वय ३०, रा. मीरा हौसिंग सोसायटी) यांना कोईम्बतूर (तामिळनाडू) येथील एका फर्मने २० लाख १४ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अटल यांनी उदय मसाला कंपनीच्या चारजणांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भरत अटल यांची मार्केट यार्डात अर्जुन देवकिसन अटल या नावाची फर्म आहे. ते हळद खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या फर्मकडून कोईम्बतूर येथील उदय मसाला कंपनीने २१ एप्रिल २०१७ ते २४ मे २०१५ या कालावधित २२ लाख ९५ हजार रुपयांची हळद खरेदी केली होती.
यापोटी कंपनीने २ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम अटल यांना दिली. उर्वरित २० लाख १४ हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. वारंवार पाठपुरावा करूनही उदय मसाला कंपनीने ही रक्कम न दिल्याने अटल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी उदय मसाला कंपनीचे मालक कृष्णकुमार, त्यांची पत्नी प्रिया कृष्णकुमार, परचेस व्यवस्थापक अरुणकुमार व अकौंटंट महेशकुमार या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.