लॉकडाऊनमध्ये शिराळ्यातील २० शाळांनी टाकली कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:10+5:302021-01-25T04:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २० शाळांनी कोरोना लॉकडाऊन काळात कात टाकली आहे. नव्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २० शाळांनी कोरोना लॉकडाऊन काळात कात टाकली आहे. नव्या रूपातील या डिजिटल शाळा विद्यार्थ्यांसाठी सज्ज झाल्या असून, शिक्षकांनी सुटीचा उपयोग शाळा सुधारण्यासाठी केल्याने पालकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
शिराळा तालुका हा डोंगरी विभागात आहे. मात्र तालुक्यातील शिक्षणाचा आलेख दिवसेंदिवस उंचावत चालला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळा गुणवत्ता विकासासाठी निकराचे प्रयत्न करीत आहेत.
कोरोनामुळे प्रदीर्घ काळ लॉकडाऊनमध्ये गेला. शाळांना सुट्या लागल्या. याच दरम्यान मिळलेल्या प्रदीर्घ सुटीचा सद उपयोग करीत तालुक्यातील २० प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या शाळांचे रुपडे पालटून, भौतिक सुधारणाबरोबरच डिजिटल वर्ग करण्यावर भर दिला आहे.
यामध्ये कणदूर, चिखली, शांतीनगर बिऊर, पाचुंब्री, रिळे, मांगरूळ, अस्वलेवाडी बेलेवाडी, शिराळेखुर्द, पाडळी, मांगले नं १ व २, मांगरुळ, आरळा सिद्धार्थनगर, सागाव १ व २, ढोलेवाडी, नाटोली, वाडीभागाई, पुनवत, करुंगली आदी शाळांचा समावेश आहे.
चौकट
अधिकाऱ्यांची प्रेरणा
तालुक्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती मधुकर डवरी, पांडुरंग गायकवाड आदींनी शिक्षकांना प्रेरणा दिली.
कोट
शाळांचा दर्जा उचविण्यासाठी ग्रामस्थ, पालक व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून हा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण देऊन, त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी यापुढेही प्रयत्न राहतील
- रामराव पाटील, मुख्याध्यापक जि. प. शाळा कणदूर
फोटो-२३पुनवत१
फोटो - कणदूर (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांसाठी नवीन आकर्षक रुपात सज्ज झाली आहे.