Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, २२ पाझर तलाव कोरडे 

By संतोष भिसे | Published: May 14, 2024 04:55 PM2024-05-14T16:55:48+5:302024-05-14T16:56:09+5:30

गतवर्षी पेक्षा हा साठा ३.९१ टीएमसीने कमी

21.73 tmc water storage was reduced due to release of water from Chandoli dam to power generation station and canal as per demand | Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, २२ पाझर तलाव कोरडे 

Sangli: चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, २२ पाझर तलाव कोरडे 

विकास शहा

शिराळा : चांदोली ( ता. शिराळा ) येथील धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या सात महिने दहा दिवसांत महिन्यात २१.७३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी पेक्षा हा साठा ३.९१ टीएमसीने कमी आहे. बांबवडे, बुदेवाडी, भटवाडी, करमाळे, औढी, सावंतवाडी, मेणी, कोळेकर वस्ती, जाधव वस्ती या ठिकाणी पाण्याच्या टँकरची मागणी केली असून बांबवडे पुदेवाडी येथे टँकर सुरू केला आहे.

सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १३०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये कॅनॉलमध्ये २०० तर नदीत ११०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणात फक्त ५.७९ टीएमसी(२१.०४%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने उघडीप दिल्याने ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद केले होते. यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. ३ ऑक्टोबर ते १४ मे अखेर २१.७३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.

या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून १२.६७ टीएमसी( ३६.८३ %) तसेच उपयुक्त साठा ५.७९ टीएमसी (२१.०४%)पाणीसाठा आहे. गेल्या सात महिने दहा दिवसांत महिन्यात २१.७३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे.गतवर्षी हा उपयुक्त साठा ९.७० टीएमसी होता म्हणजे यावर्षी ३.९१ टीएमसी साठा कमी आहे. मार्च महिन्यात ५.३९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. बाष्पीभवन होण्याचाही वेग वाढला आहे.

मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणारे पाणी बंद करावे अशी मागणी होत आहे.मोरणा धरणात ९% , कार्वे व रेठरे धरण १५%, बावीस पाझर तलाव कोरडे पडले आहेत तर २७ तलावात २५ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ३३० कूपनलिकांची पाणी पातळी घटत आहे.

आजची स्थिती

  • एकूण पाणीसाठा क्षमता ३४.४० टीएमसी
  • धरण पाणी साठा- १२.६७ टीएमसी (३६.८३ %)
  • उपयुक्त पाणीसाठा - ५.७९ टीएमसी (२१.०४ %)
  • दि.१३ रोजी २ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
  • एकूण पाऊस - १८९१ मिलिमीटर
  • वीजनिर्मिती केंद्रातून - १३०० क्युसेक
  • यातील कालव्यातून - २०० क्युसेक
  • नदीपात्रात - ११०० क्युसेक

Web Title: 21.73 tmc water storage was reduced due to release of water from Chandoli dam to power generation station and canal as per demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.