सांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:10 PM2019-07-10T15:10:40+5:302019-07-10T15:13:55+5:30

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 27 बालकांकरिता दिनांक 20 जून 2019 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले होते. या तपासणीअंती शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या २२ बालकांना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून स्वतंत्र बसने श्रीराम हॉस्पिटल येथे शस्त्राक्रियेसाठी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

 22 children leave for Akola for free surgery | सांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवाना

सांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवाना

Next
ठळक मुद्देसांगलीतून मोफत शस्त्रक्रियेसाठी २२ बालके अकोल्याला रवानाराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तपासणी शिबीर

सांगली : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 27 बालकांकरिता दिनांक 20 जून 2019 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले होते. या तपासणीअंती शस्त्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या २२ बालकांना सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथून स्वतंत्र बसने श्रीराम हॉस्पिटल येथे शस्त्राक्रियेसाठी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बालक व त्यांच्या पालकांचा पूर्ण प्रवास, शिबिरादरम्यानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्थाही पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया स्माईल ट्रेन या सेवाभावी संस्थेमार्फत करण्यात येतात. सद्यस्थितीस सांगली जिल्ह्यामध्ये ही योजना कोणत्याही रूग्णालयाकडे उपलब्ध नसून इतर शासकीय योजनांमध्ये या शस्त्रक्रियेचा समावेश नाही.

स्माईल ट्रेन या योजनेकरिता रूग्णास एकही कागदपत्राची आवश्यकता नसल्याने पालकांना सोयीचे होत आहे. अकोला येथील रूग्णालयामध्ये या योजनेतून बालकांच्या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे व पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याने रूग्णांस एक रूपयाही खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. मागील तीन वर्षापासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अकोला येथे करण्यात आलेल्या या प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर बालके सामान्य जीवन जगत असून दुभंगलेल्या ओठांमुळे त्यांच्या चेहऱ्याचे होणारे विद्रुपीकरण देखील नाहीसे झाले आहे.

खाजगी रूग्णालयात या शस्त्रक्रियांकरिता प्रति शस्त्रक्रिया 90 हजार ते 1 लाख रूपये पर्यंतचा खर्च करावा लागतो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत जिल्ह्यातील 232 बालकांवर या प्रकारच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकांमार्फत करण्यात येत आहे.

वैद्यकीय अधिकारी महिला व पुरूष, औषधनिर्माता व परिचारिका अशा 4 जणांच्या पथकांमार्फत तपासणी करण्यात येते. प्रति 25 हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 32 वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत किरकोळ आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. तपासणीमधून हृदयरोग बालके तसेच अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात.

Web Title:  22 children leave for Akola for free surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.