कोरोना लसीचे २२ हजार डोस आले, आज लसीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:16+5:302021-07-10T04:19:16+5:30
लस नसल्याने बुधवारपासून लसीकरण ठप्प होते. लसीकरणामध्ये जिल्ह्याची गती चांगली असल्याने लसींचा पुरवठा कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांपेक्षा जास्त प्रमाणात होत ...
लस नसल्याने बुधवारपासून लसीकरण ठप्प होते. लसीकरणामध्ये जिल्ह्याची गती चांगली असल्याने लसींचा पुरवठा कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांपेक्षा जास्त प्रमाणात होत आहे. शुक्रवारी २२ हजार लसी आल्यानंतर शनिवारी सकाळी लवकर त्यांचे वितरण होईल. प्राथमिक आरोग्य केेंद्रे, उपकेंद्रे व काही गावांत शाळांमध्ये लसीकरण सुरू राहील. ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिकेलाही लसी देणार असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले. लसीसाठी ५० टक्के नोंदणी कोविन पोर्टलवर व ५० टक्के नोंदणी प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहे. रात्री आठ वाजल्यापासून पोर्टलवर नोंदणी सुरू होईल.
दरम्यान, जिल्ह्यातील ४७ खासगी रुग्णालयांनीही लसीकरणासाठी आरोग्य विभागाकडे नोंदणी केली आहे; पण त्यांना लस अद्याप मिळालेली नाही. महापालिका क्षेत्रात १९, मिरज, आटपाडी, जत, शिराळा, कवठेमहांकाळ व कडेगाव तालुक्यांत प्रत्येकी १, खानापूर तालुक्यात ५, पलूस तालुक्यात ३, तासगाव तालुक्यात ४, वाळवा तालुक्यात १० रुग्णालयांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. या रुग्णालयांत लस आल्यानंतर सशुल्क लसीकरण होईल.