Sangli: टायर फुटून ट्रॉलीचा कणा तुटला, ट्रॅक्टर ट्रॉली उलटून २३ वारकरी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 12:35 PM2023-11-25T12:35:55+5:302023-11-25T12:36:09+5:30
कवठेमहांकाळ : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका हॉटेलसमोर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने २३ वारकरी ...
कवठेमहांकाळ : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका हॉटेलसमोर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने २३ वारकरी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याचे सुमारास घडला. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातातील जखमी वारकरी कारंदवाडी (ता. वाळवा) परिसरातील आहेत.
याबाबत माहिती अशी, कारंदवाडी (ता. वाळवा) येथील वारकरी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला गेले होते. तेथून ते ट्रॅक्टर (एमएच १० डीक्यू ०६७६) मधून परतत असताना कुची येथून काही अंतरावर एका हॉटेलच्यासमोर ट्रॅक्टरचा पुढील टायर फुटला. त्यामुळे ट्रॉलीशी जोडलेला कणा तुटल्याने ट्रॉली उलटली. यामध्ये एकूण २३ वारकरी जखमी झाले.
जखमींमध्ये शशिकला प्रकाश जाधव (४६),उज्ज्वला मारुती चव्हाण (४०), पार्वती अंकुश हक्के (८०),सारिका सचिन कणसे (४०), विजया बाबासाहेब जाधव (५०),मंगल महादेव लवटे (५०), अमृता दशरथ रोकडे (१२), विलास बापू आटवडे (५०), वंदना दादासाहेब मानवर (४५), श्रेयश अंकुश हक्के (१०, सर्व रा. कारंदवाडी ता.वाळवा) महेश अंकुश हक्के (१३, रा.आष्टा), आशाताई आनंदराव वळसे (६५ रा. इस्लामपूर), सुनीता वसंत खोत (४५, रा. मिरजवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे.
तर आदित्य सोमनाथ जाधव (१३), द्रोपदी बाबुराव पवार (५०), अक्काताई प्रकाश कचरे (३८), नंदा जगन्नाथ वाघमोडे (४०, रा. कारंदवाडी), लक्ष्मी रामचंद्र जाधव (६०, रा. वाळवा), मालन लक्ष्मण हक्के (६२, रा. कारंदवाडी), मंगल मच्छिंद्र मुरले (५५, रा. वाळवा), सुमन भानुदास रोकडे (७०), शैला विलास आटवडे (४०), रेखा बाळासाहेब गडदे (५० रा.कारंदवाडी), राजाराम तातोबा खिल्लारे (६२) असे किरकोळ जखमी झाले.
स्थानिकांची मदत
अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना शासकीय रुग्णालय सांगलीत हलवले आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन वारकऱ्यांची माहिती घेतली. जखमीमध्ये प्रामुख्याने कारंदवाडी येथील वारकऱ्यांचा समावेश आहे.