भेसळीच्या संशयावरून 24 किलो खव्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:48 PM2019-09-10T14:48:22+5:302019-09-10T15:06:53+5:30
अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे पलूस तालुक्यातील 8 बेकरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीच्या संशयावरून 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
सांगली : अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे पलूस तालुक्यातील 8 बेकरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये भेसळीच्या संशयावरून 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो खव्याचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
चौगुले म्हणाले, मे. न्यू गुरूप्रसाद बेकरी (भट्टी), पलूस या संस्थेकडून 4 नमुने खारी, शेव, खवा व रिफाईन्ड सरकी तेल तपासणीसाठी सील केले आहेत. खवा हा अन्न पदार्थ भेसळीचा असल्याच्या संशयावरून त्याचा 4 हजार 920 रूपये किंमतीचा 24 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
दिनांक 4 सप्टेंबर रोजी पलूस येथील. न्यू गुरूप्रसाद बेकरी, न्यू गुरूप्रसाद बेकरी (भट्टी), बालाजी केक शॉप ॲन्ड स्वीट मार्ट, बालाजी केक शॉप ॲन्ड स्वीट मार्ट (भट्टी), बेंगलोर अयंगार बेकरी, केक ॲन्ड कुकीज शॉपी, लक्ष्मी बेकरी व लक्ष्मी बेकरी (भट्टी) या बेकरींच्या तपासण्या करण्यात आल्या.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, श्रीमती एस. व्ही. हिरेमठ व नमुना सहायक तानाजी कवळे यांनी केली.