शेटफळेत तीन बंधाऱ्यांसाठी २.४० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:21 AM2021-05-30T04:21:54+5:302021-05-30T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथील ओढ्यावर तीन बंधाऱ्यांसाठी दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी
: शेटफळे (ता. आटपाडी) येथील ओढ्यावर तीन बंधाऱ्यांसाठी दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बंधाऱ्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार अनिल बाबर, शिवसेना नेते तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शेटफळेतील ओढ्यावर मृद व जलसंधारण विभागातून दोन कोटी ४० लाख रुपयांचे तीन बंधारे आ. बाबर यांनी विशेष प्रयत्न करून मंजूर केले आहेत. यामध्ये पाटीलमळानजीक ओढ्यावरील बंधाऱ्यासाठी ९० लाख, शिंदेवस्तीनजीक ८७ लाख आणि शेटफळे मुलांची जि. प. शाळेच्या पाठीमागील ओढापात्रात ६२ लाख रुपयांच्या बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, तुकाराम जानकर, शेटफळेचे उपसरपंच निवृत्ती गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, ज्येष्ठ नेते सुभाष गायकवाड, पुजारवाडीचे सरपंच ब्रह्मदेव व्हनमाने, विजय गायकवाड, अभयसिंह पोकळे, किसन गायकवाड, विपुल गायकवाड, रंजित गायकवाड, आकाश मोकाशी, संतोष मोरे, शिवाजी शिंदे, संभाजी घाडगे, धनाजी काटे, तानाजी काटे, शशिकांत बाबर, रवी पाटील, प्रफुल मोरे, सिद्धेश्वर मोरे, संपत गायकवाड, महेश शिंदे, दिलीप मोरे, दादासाहेब मोरे, सोमनाथ शिंदे, शशिकांत शिंदे, दिलीप मोरे आदी उपस्थित होते.