चुकून आलेले २४ हजार बँकेस परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:20+5:302021-06-05T04:20:20+5:30
फोटो ओळ : चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील एकनाथ महाडिक यांनी बँकेचे जादा आलेले पैसे परत केल्याने त्यांचा नंदकुमार माने, ...
फोटो ओळ : चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील एकनाथ महाडिक यांनी बँकेचे जादा आलेले पैसे परत केल्याने त्यांचा नंदकुमार माने, विठ्ठल माने, जयद्र डामसे यांनी सत्कार केला. यावेळी एस. डी. बोर्डे, सुधीर मोहिते, सुशील पाटील, पूनम पाटील, एच. आय. सावंत, आर. ए. मिसाळ उपस्थित होते.
देवराष्ट्रे : चुकून जादा गेलेले तब्बल २४ हजार रुपये एकनाथ सुभराव महाडिक (वय ६७) यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) शाखेत परत केले. प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
चिंचणी येथील महाडिक हे बँकेचे पासबुक भरण्यासाठी बँकेत आले होते, तेव्हा दुसऱ्याचे पैसे चुकून त्यांच्या पासबुकमध्ये घालून त्यांना देण्यात आले. घरी आल्यावर जेव्हा त्यांनी पासबुक उघडून पाहिले, तेव्हा त्यात मोठी रक्कम दिसली. त्यांनी बँकेत जाऊन २४ हजार रुपयांची रक्कम परत केली.
त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल नंदकुमार माने, विठ्ठल माने, शाखाधिकारी जयद्र डामसे यांचा त्यांचा सत्कार केला. यावेळी एस. डी. बोर्डे, सुधीर मोहिते, सुशील पाटील, पूनम पाटील, एच. आय. सावंत, आर. ए. मिसाळ आदी उपस्थित होते.