बेकरी पदार्थांची २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:24 AM2021-03-28T04:24:48+5:302021-03-28T04:24:48+5:30

सांगली : खाद्यतेल, डिझेल आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने बेकरीचे पदार्थही महागले आहेत. बेकरी व्यावसायिक संघटनेने उत्पादनाच्या किमती २५ ते ...

25 to 30 per cent increase in bakery prices | बेकरी पदार्थांची २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ

बेकरी पदार्थांची २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ

Next

सांगली : खाद्यतेल, डिझेल आणि कच्च्या मालाच्या दरवाढीने बेकरीचे पदार्थही महागले आहेत. बेकरी व्यावसायिक संघटनेने उत्पादनाच्या किमती २५ ते ३० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

खारी, टोस्ट, पाव, सॅंडविच ब्रेड, बिस्किटे ही मोठ्या खपाची उत्पादने किलोमागे सरसकट २० ते ३० रुपयांनी महागणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड बेकरी असोसिएशनच्या मंगळवारी (दि. २३) झालेल्या बैठकीत दरवाढीचा निर्णय झाला.

खजिनदार नाविद मुजावर म्हणाले की, खाद्यतेल आणि डिझेलच्या दरवाढीचा बोजा आवाक्याबाहेर गेल्याने दरवाढ करावी लागत आहे. सर्वच कच्च्या साहित्याची ५० ते ७० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. तेल, वनस्पती तूप, डिझेल, पॅकिंग साहित्य महागल्याने सध्याच्या दरात उत्पादने देणे शक्य नाही. त्यामुळे २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ लागू केली आहे. यावेळी प्रवीण पाटील, कृष्णराव माने, फिरोज केपी, असिफ भोकरे, संजू नायर आदी बेकरी व मिठाई उत्पादक उपस्थित होते.

बेकरीसाठी सध्या डिझेल किंवा विद्युत भट्ट्यांचा वापर होतो. डिझेल नव्वदीपर्यंत पोहोचल्याचा मोठा फटका व्यावसायिकांना बसला आहे.

चौकट

वनस्पती तूप २००० रुपयांवर

काही वस्तूंची दरवाढ अशी : वनस्पती तूप १५ किलोचा डबा १४०० रुपयांवरून २००० रुपये. डिझेल ६८ रुपये लिटरवरून ८९ रुपये. पामतेलाचा १५ किलोंचा डबा १०३० रुपयांवरून २००० ते २१०० रुपये. सरकी तेल १५ किलोचा डबा २३०० रुपये. पॅकिंगचे प्लास्टिक १६० रुपये किलोवरून २५० रुपये किलोवर. महागाईने उत्पादन खर्चात ५० ते ७० टक्के दरवाढ झाली आहे.

चौकट

खारी २२० रुपये तर ब्रेड २५ रुपये

नव्या दरवाढीनुसार १८० रुपयांच्या एक किलो खारीसाठी आता २१० ते २२० रुपये मोजावे लागतील. २०० ग्रॅमचा सॅंडविच ब्रेड २० रुपयांवरुन २३ ते २५ रुपयांवर जाईल. टोस्ट १४० रुपये किलोप्रमाणे मिळायचे, आता १६० ते १८० रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय केक, बर्गर पाव, बिस्किटे, नानकटाई, शेव यांचे दरही किलोमागे २० ते २५ रुपये वाढणार आहेत.

Web Title: 25 to 30 per cent increase in bakery prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.