बेशिस्तांनी भरला २५ लाखांचा दंड

By admin | Published: December 14, 2014 12:39 AM2014-12-14T00:39:55+5:302014-12-14T00:40:28+5:30

वर्षभरातील कारवाई : चार वर्षात वाहनधारकांकडून वसूल झाले दीड कोटी रुपये

25 lakhs fine filled with ostracisation | बेशिस्तांनी भरला २५ लाखांचा दंड

बेशिस्तांनी भरला २५ लाखांचा दंड

Next

सचिन लाड - सांगली
नाट्यपंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगलीकरांची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख होऊ लागली आहे. गेल्या चार वर्षांपासून २५ लाखांहून अधिक रकमेच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम सांगलीकरांनी यंदाही कायम ठेवला आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमधून सुमारे २५ लाखांचा दंड वसूल केला आहे.
विविध क्षेत्रात अग्रेसर असलेली सांगली अन्य राज्यांतील शहरांच्या तुलनेत वाहतुकीचे नियम तोडण्यात अग्रेसर असल्याचे दिसून येते. सिग्नल तोडणे, नो एन्ट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने चालविणे, हेल्मेट न वापरणे, गाडी चालवित मोबाईलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, लायसन्स नसणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे, फॅन्सी नंबरप्लेट, वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, वाहतुकीस अडथळा होईल असे वाहन उभे करणे, दोन वाहनांमधून मार्ग काढत जाणे, ट्रिपल सीट, भरधाव वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीट बेल्ट न लावणे, अशा चुका वाहनचालक करीत आहेत.
वाहनचालकांच्या या किरकोळ चुका केवळ दंड भरण्यासाठी नसून, यातून अपघात होत आहेत. यातून त्यांच्यासह दुसऱ्याच्या जीविताला धोका निर्माण होतो. वाहन चालविताना कोणतीही भीती बाळगली जात नसल्याने वाहनधारकांमध्ये बेदरकारपणा येऊ लागला आहे. दुचाकीस्वारांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. वेडीवाकडी वाहने चालविणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, या कारणामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

Web Title: 25 lakhs fine filled with ostracisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.