वाळव्यात २५ पासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद््घाटन- वैभव नायकवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 08:39 PM2017-11-20T20:39:17+5:302017-11-20T20:41:24+5:30
सांगली : वाळवा येथील हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४४ वी कुमार, कुमारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते
सांगली : वाळवा येथील हुतात्मा किसन अहीर विद्यालयाच्या मैदानावर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४४ वी कुमार, कुमारी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी होणार असल्याची माहिती हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.
नायकवडी म्हणाले की, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह व राज्य कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत आहे. दिवस-रात्र सत्रात होणाºया या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्'ातून मुला-मुलींचा संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. हा संघ ओरिसा येथील देशपातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल. चार दिवस चालणाºया या स्पर्धेत आठशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद््घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्'ातील आमदार, खासदार, माजी मंत्री, विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हुतात्मा समूहास खेळाची उज्ज्वल परंपरा आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रेरणेतून हजारहून अधिक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर देदीप्यमान कामगिरी केली आहे. नागनाथअण्णा तर मैदानावर घोंगडे टाकून कबड्डी व खोखोचा सराव पहात असत. कबड्डी स्पर्धेसाठी हुतात्मा विद्यालयाचे क्रीडांगण सज्ज झाले आहे. प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाथरीकर, सचिव अॅड. अस्वाद पाटील, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, कार्याध्यक्ष दिनकर पाटील हेही उपस्थित राहणार असल्याचे नायकवडी यांनी सांगितले.