जिल्ह्यातील वारणा धरणात 25.14 टी.एम.सी. पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 12:05 PM2021-07-21T12:05:44+5:302021-07-21T12:07:19+5:30

Rain Dam Sangli : सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.14 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

25.14 TMC in Warna Dam in the district. For water | जिल्ह्यातील वारणा धरणात 25.14 टी.एम.सी. पाणीसाठा

जिल्ह्यातील वारणा धरणात 25.14 टी.एम.सी. पाणीसाठा

googlenewsNext
ठळक मुद्देवारणा धरणात 25.14 टी.एम.सी. पाणीसाठाशिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पाऊस

सांगली: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.14 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 54.06 (105.25), धोम 6.66 (13.50), कन्हेर 4.93 (10.10), दूधगंगा 12.55 (25.40), राधानगरी 4.64 (8.36), तुळशी 2.00 (3.47), कासारी 1.92 (2.77), पाटगांव 2.55 (3.72), धोम बलकवडी 2.27 (4.08), उरमोडी 5.69 (9.97), तारळी 3.89 (5.85), अलमट्टी 93.53 (123).

सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे

 कण्हेर 24, वारणा 1110, दुधगंगा 100, राधानगरी 1350, कासारी 250 व अलमट्टी धरणातून 37 हजार 787 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 7.0 (45), आयर्विन पूल सांगली 8.3 (40) व अंकली पूल हरिपूर 9.6 (45.11).

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पाऊस

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात 10.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी

मिरज 5.0 (339.9), जत 4.6 (319.6), खानापूर-विटा 3.9 (229.7), वाळवा-इस्लामपूर 3.1 (312.9), तासगाव 3.6 (297.4), शिराळा 10.8 (472.1), आटपाडी 2.8 (232.3), कवठेमहांकाळ 3.3 (269.7), पलूस 1.6 (306.2), कडेगाव 4.8 (233.2).

Web Title: 25.14 TMC in Warna Dam in the district. For water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.