मिरजमधील 26 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 24 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह; अमित देशमुखांनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 02:13 PM2020-04-10T14:13:39+5:302020-04-10T14:13:46+5:30

मिरज येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली होती.

Of the 26 coronary artery patients in the mirage, 24 were reported negative; Amit Deshmukh congratulated | मिरजमधील 26 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 24 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह; अमित देशमुखांनी केले अभिनंदन

मिरजमधील 26 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 24 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह; अमित देशमुखांनी केले अभिनंदन

Next

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे 25 कोविड-19  रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या सर्व रुग्णांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णांपैकी काल चोवीस रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे.

मिरज येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली होती. सांगली जिल्ह्यातील कोविड-19 ग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ नये यादृष्टीने मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या कोविड-19 ग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याच्या दृष्टीने मुंबईतील ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली याच महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनायक सावर्डेकर आणि डॉ. प्रशांत होवाळ यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती या समितीने तातडीने सांगली येथे जाऊन परिस्थितीवर नियंत्रण व उपचाराच्या नियोजनाचे काम 28 मार्च रोजी हाती घेतले होते.

सांगली जिल्ह्यातील कोविड-19 ग्रस्त रुग्णांची संख्या लक्षात घेता गरज भासल्यास मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे 315 खाटांच्या कोविड-19 रुग्णालयात तातडीने रूपांतर करण्यात आले होते. याच ठिकाणी सिटीस्कॅन, एम. आर. आय. लिक्विड ऑक्सिजन, सोनोग्राफी, डायलिसिस, व पंधरा बेडचे आय.सी.यू. सज्ज ठेवण्यात आले होते. याशिवाय कोविड-19 तपासणी केंद्र तातडीने उभारून ते सुरूही करण्यात आले होते. या रुग्णालयात दाखल झालेले आणखी दोन कोविडग्रस्त रुग्णही लवकर बरे होतील आणि सांगली जिल्हा पूर्णपणे कोविड-19 मुक्त करण्यात आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास डॉक्टर पल्लवी सापळे यांनी व्यक्त केला आहे.

सांगली येथे एकूण 25 ‘कोविड-19’ ग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आले होते यानंतर यात एका रुग्णांची भर पडली होती. ज्या 24 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यांचे 14 दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी डॉक्टर पल्लवी सापळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सांगली जिल्हा कोविड-19 मुक्त करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या मोहिमेला विशेष पाठिंबा दिला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री  जयंत पाटील यांनी वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना दिल्या, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ.संजय मुखर्जी, मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयाच्या कोविड 19 समन्वयक विनिता सिंगल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने,सांगलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नानंदकर यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश मिळाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत

Web Title: Of the 26 coronary artery patients in the mirage, 24 were reported negative; Amit Deshmukh congratulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.