जिल्ह्यात २६ नवे रुग्ण, २० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:36 AM2020-12-30T04:36:50+5:302020-12-30T04:36:50+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २६ नवे कोरोना रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात २० जणांनी कोरोनावर मात ...
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात २६ नवे कोरोना रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. दिवसभरात २० जणांनी कोरोनावर मात केली असून ४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
महापालिका क्षेत्रात मंगळवारी सांगलीत एकतर मिरजेत पाच रुग्णांची नोंद झाली. आटपाडी, खानापूर, वाळवा व मिरज तालुक्यात प्रत्येकी ३, तासगाव व शिराळा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण तर कवठेमहांकाळ तालुक्यात सहा नवे रुग्ण आढळून आले. जत, पलूस व कडेगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.
दिवसभरात आरटीपीसीआरच्या २८६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १०९८ चाचण्यांत १७ रुग्ण सापडले. सध्या ४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३१, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ५, तर नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ५ रुग्ण आहेत. कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटक येथील प्रत्येकी एक रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाला आहे. सध्या परजिल्ह्यातील १८ रुग्ण उपचाराखाली असून चारजणांनी कोरोनावर मात केली आहे.
चौकट
मंगळवारी दिवसभरात...
आजचे रुग्ण : २६
उपचाराखालील रुग्ण : १८३
आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४५,६४५
मृत्यू : १७३०
आजअखेरचे एकूण रुग्ण : ४७५५८
चिंताजनक : ४१
चौकट
रुग्णसंख्या अशी
सांगली : १
मिरज : ५
आटपाडी : ३
कडेगाव : ०
खानापूर : ३
पलूस : ०
तासगाव : १
जत : ०
कवठेमहाकांळ : ६
मिरज : ३
शिराळा : १
वाळवा : ३