शौचालय बांधकामासाठी २७ हजार गृहभेटी देणार

By admin | Published: December 13, 2014 12:01 AM2014-12-13T00:01:08+5:302014-12-13T00:17:59+5:30

सतीश लोखंडे : जिल्हा परिषदेचा उपक्रम; अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार

27 thousand homewards for the construction of toilets | शौचालय बांधकामासाठी २७ हजार गृहभेटी देणार

शौचालय बांधकामासाठी २७ हजार गृहभेटी देणार

Next

सांगली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्याचे चालूवर्षीचे वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट १०५ गावांकरिता ३१ हजार ४७२ इतके आहे. या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी व त्याचा वापर करण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून गृहभेट विशेष मोहीम राबविण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी येथे दिली.
जिल्ह्यातील १०५ गावांतील २७ हजार ७१४ इतक्या शौचालय नसलेल्या कुटुंबांना १ हजार ९१६ शासकीय अधिकारी व कर्मचारी भेट देऊन, शौचालय बांधकाम करण्यासाठी कुटुंबांच्या मानसिकतेत बदल करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने तालुकास्तरीय विभाग प्रमुख, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, कक्ष अधिकारी, कंत्राटी कर्मचारी व आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी सहभाग घेऊन गृहभेट देणार आहेत.
या अभियानाच्या अंमलबावणीसाठी तालुकानिहाय गृहभेट देण्यात येणाऱ्या गावांची संख्या, नियुक्त कर्मचारी व गृहभेट कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आटपाडी - १३ गावे, १४० कर्मचारी व २ हजार ५०० कुटुंबे. जत - १७ गावे, २७२ कर्मचारी व ४ हजार २२८ कुटुंबे. कडेगाव - १६ गावे, ८४ कर्मचारी व २ हजार २६६ कुटुंबे. कवठेमहांकाळ - ५ गावे, १७० कर्मचारी व १ हजार २०० कुटुंबे. खानापूर - ११ गावे, ७१ कर्मचारी व १ हजार ३६४ कुटुंबे. मिरज - १० गावे, ३६९ कर्मचारी व ५ हजार २६० कुटुंबे. पलूस - ७ गावे, १८० कर्मचारी व २ हजार ९३ कुटुंबे. शिराळा - ६ गावे, ६० कर्मचारी व १ हजार १६५ कुटुंबे. तासगाव - १० गावे, १६८ कर्मचारी व ३ हजार १६० कुटुंबे. वाळवा - १० गावे, ४०२ कर्मचारी व ४ हजार ४७८ कुटुंबे.
या अभिनव उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली असून या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती अंमलबजावणी करणार आहेत. या मोहिमेची सुरुवात आता जिल्ह्यात करण्यात आली असून महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)

अडसूळ यांची नियुक्ती
या अभिनव उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Web Title: 27 thousand homewards for the construction of toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.