नोकरदारांना दिलेल्या कर्जाची २८ कोटी थकबाकी, सांगली जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी विशेष मोहीम 

By अशोक डोंबाळे | Published: May 18, 2024 06:51 PM2024-05-18T18:51:26+5:302024-05-18T18:52:20+5:30

शिक्षण संस्थेने काढले शिक्षकांच्या नावावर कर्ज

28 crores outstanding of loans given to employees, Special campaign for recovery from Sangli District Bank | नोकरदारांना दिलेल्या कर्जाची २८ कोटी थकबाकी, सांगली जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी विशेष मोहीम 

नोकरदारांना दिलेल्या कर्जाची २८ कोटी थकबाकी, सांगली जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी विशेष मोहीम 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पगारदार नोकरदारांना दिलेल्या कर्जापैकी तब्बल २८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी बँकेने धडक मोहीम राबवली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत.

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसह साखर कारखाने, उद्योग धंदे, बचत गट याशिवाय नोकरदार या घटकांना कर्जपुरवठा केला जातो. एकीकडे शेतकरी कर्ज वसुली नियमित होत असताना पगारदार नोकरदारांच्या कर्ज वसुलीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी नोकरदारांचे ५६ कोटी रुपयांचे कर्ज थकित होते. त्या दरम्यान बँकेने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर २८ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली.

शिक्षण संस्थेने काढले शिक्षकांच्या नावावर कर्ज

पगारदारांच्या थकबाकीत आटपाडीतील एका शिक्षण संस्थेने शिक्षकांच्या नावावर काढलेले तब्बल २२ कोटी रुपये थकित होते. याप्रकरणी बँकेने संबंधितांना वसुलीच्या नोटीस दिल्या होत्या. मात्र वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु बँकेने वसुलीसाठी शिक्षकांकडे तगादा लावला आहे, असेही बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जूनअखेरपर्यंत १५ कोटी वसूल करणार : शिवाजीराव वाघ

सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकित रकमेच्या वसुलीसाठी आराखडा तयार केला आहे. जूनअखेर १५ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची विशेष पथके नियुक्त केली आहेत. थकबाकी भरली नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिला आहे.

Web Title: 28 crores outstanding of loans given to employees, Special campaign for recovery from Sangli District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.