सांगली सिव्हिलमध्ये ३०० ऑक्सिजनचे बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:51+5:302021-05-25T04:30:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संजयनगर : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार सुरु करण्यात येणार आहेत. या ठिकाणी तीनशे बेडला कायमस्वरुपी ऑक्सिजनचा पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता पोलीस बंदोबस्तात पुण्याहून १५ टन ऑक्सिजन लिक्विड टँकर सिव्हिलमध्ये दाखल झाला आहे. याबाबतची माहिती वसंतदादा शासकीय रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.
सिव्हिलमध्ये असलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये पुण्याहून आलेल्या ऑक्सिजन टँकरमधील लिक्विड टाकीत ठेवला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता पुण्याहून पिंपरी चिंचवड एमआयडीसी चाकण या ठिकाणाहून १५ टन लिक्विड ऑक्सिजन टँकर सांगलीतील सिव्हिलमध्ये पोलीस बंदोबस्तात दाखल झाला. या ऑक्सिजनचा पुरवठा येथील तीनशे बेडला कायमस्वरुपी सुरुच राहाणार आहे. दररोज अंदाजे एक टन आता ऑक्सिजन सिव्हिलसाठी लागत आहे. सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार होणार आहेत. तीनशे बेडला ऑक्सिजनचा सोमवारपासून कायमस्वरुपी पुरवठा सुरु करण्यात आला. पुण्याहून पहिला १५ टन ऑक्सिजन टँकर सिव्हिलमध्ये पहिल्यांदाच दाखल झाला आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.
यावेळी डॉ. नंदकिशोर गायकवाड, डॉ. मनोज पवार, डॉ. अष्टेकर, महेश होवाळ, पी. आर. पाटील, मुनीर पठाण, प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते.