वारणा धरणात 30.08 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:42 PM2019-08-01T13:42:23+5:302019-08-01T13:44:45+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 30.08 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 30.08 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 78.30 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.29 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.01 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 16.79 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.32 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 105.87 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
वारणा धरणातून कालवा व विद्युतगृहाव्दारे 874 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.
- कृष्णा पूल कराड 18.11 (45),
- आयर्विन पूल सांगली 34.6 (40)
- अंकली पूल हरिपूर 39.4 (45.11).
जिल्ह्यात सरासरी 19.10 मि. मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 19.10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 69.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 17 (311.4), जत झ्र 1.1 (153.8), खानापूर-विटा 8.4 (163.8), वाळवा-इस्लामपूर 28.8 (369.6), तासगाव 9.3 (227), शिराळा 69.3 (969.1), आटपाडी -निरंक (150.4), कवठेमहांकाळ 3.9 (183.1), पलूस 19.8 (248.8) व कडेगाव 17.6 (335.6).