सांगलीतील भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून जमीन व्यवहारात ३१ लाखांचा गंडा, बारा जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:21 AM2022-12-23T11:21:52+5:302022-12-23T12:24:26+5:30

करारपत्रावरील व्यक्तीही बोगस

31 lakh fraud in land transaction by the security guards of BJP MPs in Sangli, crime against twelve persons | सांगलीतील भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून जमीन व्यवहारात ३१ लाखांचा गंडा, बारा जणांवर गुन्हा 

सांगलीतील भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून जमीन व्यवहारात ३१ लाखांचा गंडा, बारा जणांवर गुन्हा 

Next

सांगली : शेतजमीन देण्याच्या आमिषाने एकास ३१ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिसासह १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी जयदेव रामचंद्र काळे (रा. जायगव्हाण, ता. कवठेमहांकाळ) यांनी पोलिस कर्मचारी कृष्णदेव रामचंद्र पाटील (वय ३५, रा. वायफळे, ता. तासगाव), विनायक रामचंद्र सुतार (३४, रा. वासुंबे, ता. तासगाव), अरविंद मच्छींद्र पाटील (३५, रा. बलगवडे, ता. तासगाव) आणि सुधीर ऊर्फ भय्या शिंगाटे (रा. पंढरपूर) यांच्यासह अनोळखी आठ जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जानेवारी २०१८ मध्ये संशयितांनी फिर्यादी काळे यांना तासगाव ते कुमठा फाटा मार्गावर रसूलवाडी रस्त्यावरील आठ एकर १६ गुंठे जमिनीची विक्री करायची असून, ती खरेदी करण्याची गळ घातली होती. यावेळी काळे यांनी त्यांचे मित्र विजय चव्हाण यांना ही जमीन दोघांत घेऊ, असे सांगत पुढील व्यवहार केले होते.

यात खरेदीची इसारत रक्कम म्हणून १ लाख रुपये आणि सात-बारा उताऱ्यावरील बँकेचा बोझा कमी करण्यासाठी २४ लाख आणि धनादेशाने ६ लाख असे एकूण ३१ लाख रुपये दिले होते. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही व्यवहार होत नसल्याने पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा केला; मात्र पैसे मिळाले नसल्याने अखेर त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सर्व संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करारपत्रावरील व्यक्तीही बोगस

संशयित चौघांनी शेतजमिनीच्या करारावर अमित मनोहर मुळे, अभिजित मनोहर मुळे, आशालता मनोहर मुळे, जिवंधर भूपाल मुळे, सुकुमार भूपाल मुळे, उत्तम भूपाल मुळे, युगंधर श्रीपाल मुळे, चंद्रकांत श्रीपाल मुळे यांचे फोटो लावले होते. मुळे हेच शेतजमिनीचे मालक आहेत, अशी ओळख करून देण्यात आली होती.

संशयितांना पाच दिवसांची कोठडी

या गुन्ह्यात पोलिस कृष्णदेव पाटील याच्यासह विनायक सुतार, अरविंद पाटील यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: 31 lakh fraud in land transaction by the security guards of BJP MPs in Sangli, crime against twelve persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.