वारणा धरणात 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा, शिराळा तालुक्यात 41.3 मि. मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:43 PM2020-08-18T12:43:09+5:302020-08-18T12:47:00+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 92.28 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 11.88 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.27 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.32 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.34 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.52 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.24 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 102.41 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 55958 क्युसेक्स, धोम 1161, कण्हेर धरणातून 7038 क्युसेक्स, वारणा धरणातून 12264 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 7700 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, तुळशी धरणातून 884 क्युसेक्स, कासारी धरणातून 1750 क्युसेक्स, धोम बलकवडी धरणातून 1225 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 4330 क्युसेक्स, तारळी धरणातून 2626 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 250000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी
शिराळा तालुक्यात 41.3 मि. मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.62 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 41.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 5.1 (397.3), तासगाव 4.7 (359), कवठेमहांकाळ 1.0 (404.9), वाळवा-इस्लामपूर 7.2 (461.5), शिराळा 41.3 (1074.4), कडेगाव 6.0 (390.7), पलूस 4.0 (320.2), खानापूर-विटा 2.4 (466.2), आटपाडी 0.0 (286.0), जत 0.5 (232.4).