वारणा धरणात 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा, कोयना धरणातून 25000 क्युसेक्स विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:21 PM2020-08-21T17:21:42+5:302020-08-21T17:22:56+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.79 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सध्या कोयना धरणात 94.62 टी.एम.सी.पाणीसाठा आहे. असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी आहे. संध्याकाळी 5.30 वाजता सध्याचा असणारा 12059 विसर्ग वाढ करून एकूण विसर्ग 25000 क्युसेक्स असेल. धरण परिचलन करणे साठी विसर्गात दहा हजार ते पंचवीस हजार क्युसेक्स असा वारंवार बदल करावा लागेल. तरी विसर्गाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये.
सातारा जिल्ह्यातील धोम धरणात 12.55 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.01 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.45 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.39 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.68 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.29 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 97.99 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 203, कण्हेर 2691, वारणा 2995, दूधगंगा 1800, राधानगरी 4256, तुळशी 504, कासारी 250, पाटगाव 2197, धोम बलकवडी 2116, उरमोडी 1710, तारळी 834, अलमट्टी 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 13.9 (45), आयर्विन पूल सांगली 33.6 (40) व अंकली पूल हरिपूर 39.9 (45.11).