वारणा धरणात 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:17 PM2020-08-22T17:17:27+5:302020-08-22T17:19:09+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 95.16 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.97 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.18 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.47 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.46 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.27 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 102.41 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 27747 क्युसेक्स, धोम 1427, कण्हेर धरणातून 2735 क्युसेक्स, वारणा धरणातून 11978 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 3800 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, तुळशी धरणातून 507 क्युसेक्स, कासारी धरणातून 250 क्युसेक्स, धोम बलकवडी धरणातून 1223 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 3087 क्युसेक्स, तारळी धरणातून 1530 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 251922 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.9 (45), आयर्विन पूल सांगली 23.3 (40) व अंकली पूल हरिपूर 29.11 (45.11).
शिराळा तालुक्यात 18.5 मि. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.98 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 18.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस
मिरज 1.1 (406.3), तासगाव 0.2 (360.6), कवठेमहांकाळ 0.0 (407.2), वाळवा-इस्लामपूर 4.0 (477.4), शिराळा 18.5 (1144.2), कडेगाव 1.9 (398.1), पलूस 1.0 (326.2), खानापूर-विटा 0.2 (470.6), आटपाडी 0.0 (288), जत 0.0 (233.1).