वारणा धरणात 32.66 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 11:37 AM2020-08-27T11:37:07+5:302020-08-27T11:38:04+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 32.66 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात 32.66 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 97.30 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.98 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.68 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.56 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.79 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.21 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 120.92 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग
धोम 398, कण्हेर 574, वारणा 3054, दूधगंगा 700, राधानगरी 1400, कासारी 250, पाटगाव 1727, धोम बलकवडी 311, उरमोडी 400 व अलमट्टी धरणातून 1 लाख 75 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा
कृष्णा पूल कराड 14.8 (45), आयर्विन पूल सांगली 12.3 (40) व अंकली पूल हरिपूर 14.9 (45.11).