आटपाडी तालुक्यात दहा गावांसाठी ३२७ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:27 AM2020-12-31T04:27:58+5:302020-12-31T04:27:58+5:30
शेटफळे येथे बिनविरोध निवडणूक होण्यासाठी अनेक बैठका झाल्या. त्याच गावात तालुक्यातील सर्वाधिक ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावनिहाय ...
शेटफळे येथे बिनविरोध निवडणूक होण्यासाठी अनेक बैठका झाल्या. त्याच गावात तालुक्यातील सर्वाधिक ६० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावनिहाय सदस्य संख्या आणि उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची संख्या अशी : शेटफळे १३ सदस्यांसाठी ६० अर्ज, विठ्ठलापूर ९ सदस्यांसाठी ५१ अर्ज, लेंगरेवाडी ९ सदस्य २३ अर्ज, बोंगेवाडी ७ सदस्यांसाठी २५ अर्ज, माडगुळे ९ सदस्यांसाठी ३३ अर्ज, देशमुखवाडी ७ सदस्यांसाठी २५ अर्ज, पात्रेवाडी ७ सदस्यांसाठी १५ अर्ज, तळेवाडी ९ सदस्यांसाठी ३६ अर्ज, धावडवाडी ७ सदस्यांसाठी १८ अर्ज, घरनिकी ११ सदस्यांसाठी ४० अर्ज, असे एकूण ८८ सदस्यांसाठी ३२७ अर्ज दाखल झाले आहेत.
ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्यामुळे तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात इच्छुक उमेदवारांना थेट अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.