कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ३३० एसटी फेऱ्या बंद

By admin | Published: July 26, 2016 11:41 PM2016-07-26T23:41:56+5:302016-07-26T23:41:56+5:30

महाराष्ट्रातील बसेस थांबून : मिरज आगाराला सर्वाधिक फटका; तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

330 ST rounds in Karnataka are closed | कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ३३० एसटी फेऱ्या बंद

कर्नाटकमध्ये जाणाऱ्या ३३० एसटी फेऱ्या बंद

Next

मिरज : कर्नाटकात एसटी बंद आंदोलनामुळे व दगडफेकीच्या भीतीमुळे मिरज डेपोसह जिल्ह्यातील अन्य आगारांतून कर्नाटकात एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मिरज आगारातून दररोज ८० फेऱ्या व अन्य २५० एसटी फेऱ्या बंद झाल्याने एसटीला फटका बसला आहे. कर्नाटक एसटी बंद असल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य वाहतूक असलेल्या मिरज बसस्थानकात शुकशुकाट आहे.
कर्नाटकातील एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. यामुळे गेले दोन दिवसांपासून कर्नाटक एसटी बंद आहे. कर्नाटक सीमेलगत असलेल्या मिरजेतून जमखंडी, अथणी, बेळगाव, विजापूर, बागलकोट, उगार, कुडची, रायबाग, कागवाड येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक आहे. कर्नाटकातून मिरजेत दररोज सुमारे ३०० एसटी फेऱ्या करण्यात येत असल्याने, मिरज बसस्थानकात कर्नाटक एसटी गाड्यांची वर्दळ असते. मिरजेतून दररोज जमखंडी, अथणी, बेळगाव परिसरात ८० फेऱ्या करण्यात येतात. मात्र गेले दोन दिवस कर्नाटक एसटी बंदमुळे मिरज बसस्थानकात एसटी गाड्यांची व प्रवाशांची गर्दी कमी आहे.
कर्नाटक एसटी कर्मचाऱ्यांच्या बंद आंदोलनामुळे राज्य परिवहन मंडळाने आंतरराज्य बस फेऱ्या बंद केल्या आहेत. कर्नाटकात दगडफेक व गाड्या अडविण्याच्या भीतीमुळे बसफेऱ्या बंद केल्याचे मिरज आगार व्यवस्थापक रवींद्र थलवर यांनी सांगितले. कर्नाटकात एसटी वाहतूक बंद असल्याने मिरज बसस्थानकासमोरून वडाप वाहतूक तेजीत आहे. वडापचा दर व वाहनांची संख्या वाढली असून, प्रवासी दाटीवाटीने प्रवास करीत आहेत. कर्नाटकात जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू असल्याने रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. (वार्ताहर)


सांगली, मिरज आगार : कोटीचे नुकसान
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कर्नाटकच्या सीमा भागातील बहुतांशी गावांमध्ये बसेस रोज जात आहेत. मिरज बसस्थानकात कर्नाटक एसटी गाड्यांची वर्दळ असते. मिरजेतून दररोज जमखंडी, अथणी, बेळगाव परिसरात ८० फेऱ्या करण्यात येतात. सांगली आगारातूनही बेळगाव, विजापूर, अथणी या ठिकाणी बसेस जात आहेत. मात्र गेले दोन दिवस कर्नाटक एसटीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या बंद आहेत. यामुळे सांगली, मिरज, जत, कवठेमहांकाळ आगाराचे कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. याबद्दल संबंधित आगारप्रमुख चिंतेत आहेत.

Web Title: 330 ST rounds in Karnataka are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.