सांगली बसस्थानकातून महिलेचे ३३ हजारांचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:18+5:302021-07-31T04:26:18+5:30
सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बसमधून उतरत असलेल्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. खांद्यावर अडकविलेल्या पर्स आणि पाकिटात ...
सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात बसमधून उतरत असलेल्या महिलेच्या पर्समधील दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. खांद्यावर अडकविलेल्या पर्स आणि पाकिटात ठेवलेल्या रोख पाच हजार रुपयांसह ३ सोन्याच्या अंगठ्या, असा ३३ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी रशिदा सिकंदर सुतार (रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रशिदा या बुधवार, दि. २८ रोजी दुपारी दीडच्या सुमारास बसने सांगलीत आल्या होत्या. त्या बसमधून उतरत असताना त्यांनी बॅग खांद्याला अडकविली होती. या पर्स व पाकिटात त्यांनी दागिने व रोख रक्कम ठेवली होती. बसमधून उतरत असताना चोरट्यांनी अलगदपणे पर्समध्ये हात घालून दागिने व रोख रक्कम लंपास केली. चाेरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.