वारणा धरणातून 3400 तर कोयना धरणातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:04 AM2019-08-03T11:04:40+5:302019-08-03T11:17:06+5:30
कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 79.56 टी.एम.सी. असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली.
सांगली : कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात ८८ टी.एम.सी. पाणीसाठा असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली.
कोयना पणलोट क्षेत्रात मुसळधार २१३ मी मी पाऊस सुरू आहे. कोयना धरण ८८ टिएमसी भरले आहे. आज दुपारी १ वाजता वक्र दरवाजे उघडणार आहे कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सकाळी ७ पर्यंत महाबळेश्वर 213 तर नवजा 155 मी मी पाऊस झाला आहे. पाण्याची आवक 64400 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकूण पाणीसाठा 88 टी.एम.सी.झाला आहे. धरणातून वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते 20 हजार क्युसेक्स विसर्ग होणार आहे.
सांगली येथील आयर्विन पूल या ठिकाणी पाण्याची पातळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 34 फूट इतकी आहे. राज्यमार्ग ३, प्रमुख जिल्हामार्ग ८ व ग्रामीण रस्ते ४ पाण्याखाली गेलेले आहेत. सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, दत्तनगर, कर्नाळ रस्ता या ठिकाणावरील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटूंबांची संख्या ८१असून एकूण व्यक्तिंची संख्या 364 इतकी आहे. महानगरपालिका शाळा क्रमांक 1 व 25 मध्ये एकूण 106 व्यक्तिंना स्थलांतरीत करण्यात आले आहे. उर्वरित व्यक्ती नातेवाईक यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात राहण्यास गेले आहेत.