वारणा धरणात 34.02 तर कोयना धरणामध्ये 103.20 टी.एम.सी पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 02:46 PM2019-09-10T14:46:41+5:302019-09-10T14:47:43+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 पर्यंत 34.02 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
दिनांक 10 सप्टेंबर रोजीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 103.20 टी.एम.सी. इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 13.27 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.79 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 96.30 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 9 हजार 943 क्युसेक्स तर कोयना धरणातून 20 हजार 34 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणातून 2 लाख 13 हजार 491 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. आयर्विन पुल सांगली येथे 32 फूट 7 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 45 फूट) तर अंकली पुल हरिपूर येथे 38 फूट 3 इंच इतकी पाण्याची पातळी आहे (धोका पातळी 50 फूट 3 इंच).
जिल्ह्यात सरासरी 2.70 मि. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 2.70 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
कालपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी कंसात 1 जुनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 2.3 (519.1), जत झ्र निरंक (185.3), खानापूर-विटा 0.8 (320.4), वाळवा-इस्लामपूर 3.1 (724.6), तासगाव 1.5 (391.1), शिराळा 13.5 (1865.3), आटपाडी - निरंक (184.1), कवठेमहांकाळ 0.8 (296.4), पलूस 1 (425) व कडेगाव 1.6 (691).