वारणा धरणात 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 06:09 PM2020-09-19T18:09:11+5:302020-09-19T18:10:10+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 104.72 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 13.23 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कण्हेर धरणात 9.94 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.88 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 25.39 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणाची साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच तारळी धरणाची साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. असून हे धरणही 100 टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. धोम 130, कण्हेर 374, वारणा 582, दुधगंगा 600, राधानगरी 250, तुळशी 128, कासारी 250, पाटगाव 328 व अलमट्टी धरणातून 37000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.7 (45), आयर्विन पूल सांगली 9.3 (40) व अंकली पूल हरिपूर 10.2 (45.11).
आटपाडी तालुक्यात 94.7 मि. मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.44 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 94.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 14.7 (521.4), तासगाव 0.3 (435.8), कवठेमहांकाळ 0.4 (496.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (603.8), शिराळा 0.0 (1288.5), कडेगाव 0.5 (532.2), पलूस 0.7 (439.2), खानापूर-विटा 15 (675.2), आटपाडी 94.7 (648.7), जत 11.9 (331.5).