वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:16 AM2020-10-06T11:16:39+5:302020-10-06T11:18:26+5:30
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच कोयना, दुधगंगा, तुळशी, पाटगाव, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी ही धरणेही 100 टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच कोयना, दुधगंगा, तुळशी, पाटगाव, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी ही धरणेही 100 टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
धोम धरणात 13.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कण्हेर धरणात 10.04 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. आहे. राधानगरी धरणात 8.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी., कासारी धरणात 2.74 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 2.77 टी.एम.सी. आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर 274, कासारी 250 व अलमट्टी धरणातून 16 हजार 922 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 4.9 (45), आयर्विन पूल सांगली 7.6 (40) व अंकली पूल हरिपूर 6.3 (45.11).
तासगाव तालुक्यात 17.8 मि. मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.82 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तासगाव तालुक्यात सर्वाधिक 17.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.
मिरज 0.4 (576.9), तासगाव 17.8 (532.6), कवठेमहांकाळ 3 (586.8), वाळवा-इस्लामपूर 3.4 (648), शिराळा 0.0 (1314.5), कडेगाव 3.2 (585), पलूस 12.2 (502.9), खानापूर-विटा 4.2 (770.8), आटपाडी 11.3 (750.9), जत 0.9 (399.8).